मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अनेकांनी राज कुंद्राविरोधात विविध आरोप करायला सुरुवात केली.
राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री गहना वशिष्ठने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित गहनाला नोटीस बजावण्यात आली आहे. क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने गहना वशिष्ठसह 3 लोकांना नोटीस पाठवली आहे. प्रॉपर्टी सेल या लोकांकडून पॉर्न फिल्म रॅकेट बाबत चौकशी केली आहे. गहना वशिष्ठला प्रॉपर्टी सेलसमोर उभं राहावं लागेल.
मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील फिल्म रॅकेट प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला 7 फेब्रुवारीला अटक केली होती. सुमारे सहा महिने चाललेल्या एका तपासणीनंतर राज कुंद्राला अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेरचा सामना गमावूनही प्रशिक्षक राहुल द्रविडचे ‘या’ कारणासाठी होत आहे कौतुक
- चंद्रपूर शहरात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ, आ. जोगरेवारांनी मनपा आयुक्तांना दिल्या ‘या’ सूचना
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- बचावकार्याचा वेग वाढवून राज्य सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी – आठवले
- दुसऱ्या टी-२० सामन्यात झिंबाब्वेचा बांग्लादेशवर धक्कादायक २३ धावांनी विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

