Share

वैफल्यग्रस्त भावनेतून गीतेंनी ‘ते’ वक्तव्य केले, सुनील तटकरेंचा पलटवार

Published On: 

मुंबई: शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतीत केलेल्या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे.

सेनेचे अनंत गीते यांनी वैफल्यग्रस्त भावनेतून ते वक्तव्य केलं आहे. असे म्हणत त्यांनी सध्या सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी गितेंची अवस्था झाली आहे. मात्र अनंत गिते यांच्या बोलल्याने काही फरक पडत नाही. गितेंच्या विधानावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे असंही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान अनंत गीते यांनी महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधी एकत्र होऊ शकत नाही मग सेना आणि काँग्रेस कशी एकत्र होणार. असे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. असे विधान करत शरद पवार हे आमचे नेते होऊच शकत नाहीत. एकत्र येऊन आघाडी सरकार स्थापन करणे म्हणजे सत्तेसाठी तडजोड होती. असे विधान केले आहे. यावरच आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!