नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddeen) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील वादावर केलेल्या ट्विटवर सुनील गावस्कर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अझरुद्दीनची काही आतली माहिती असेल तर ती सांगावी, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी मोहम्मद अझरुद्दीनने ट्विट करून विराटने वनडे आणि रोहितने कसोटी मालिकेतून ब्रेक घेतला असून या खेळाडूंनी विश्रांती घेण्याची वेळ चुकीची असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तडा गेल्याच्या बातम्यांना हवा मिळते.
मोहम्मद अझरुद्दीनच्या याच ट्विटवर सुनील गावस्कर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. असा अंदाज लावणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अझरुद्दीनला काही आतील गोष्टी माहिती असेल, तर त्याने ती सर्वांना सांगावी. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही खेळाडू जोपर्यंत आपापसात काही बोलत नाहीत, तोपर्यंत आपण कोणतेही मत बनवू नये प्रथम प्रश्न उपस्थित करू नये.
खरं तर, अलीकडेच विराट कोहलीला भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं. त्याच्या जागी रोहित शर्माला वनडेचा कर्णधार बनवण्यात आले. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र विराट कोहलीने या वृत्तांचे स्पष्ट खंडन केले आहे.
Virat Kohli has informed that he's not available for the ODI series & Rohit Sharma is unavailable fr d upcoming test. There is no harm in takin a break but d timing has to be better. This just substantiates speculation abt d rift. Neither wil be giving up d other form of cricket.
— Mohammed Azharuddin (@azharflicks) December 14, 2021
दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सांगितले की, त्याच्या आणि रोहित शर्मामध्ये कोणताही वाद नाही. हे अनेकदा सांगितले आहे आणि पुढेही सांगणार आहे. विराट कोहलीनेही सांगितले की, मी एकदिवसीय मालिकेतून ब्रेक मागितला नाही आणि निवडीसाठी तो पूर्णपणे उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू नाही; योगी सरकारचा दावा
- ‘थकबाकीचा डोंगर वाढतोय, राज्याच्या हक्काचे पैसे मिळायलाच पाहिजे’, शिवसेनेचा केंद्राला इशारा
- बाहेरच्या बाहेर खंडणीचा निधी मिळत असेल तर सरकारी निधीची गरज काय?
- महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी
- केंद्रातील भाजपा व संघांचा आरक्षण संपवण्याचा डाव-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

