🕒 1 min read
मुंबई : शिवसेना पक्षाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नेस्ले सभागृहात शिवसेना गटप्रमुखांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर सडकून टीका केली. त्यावर अनेक सत्ताधारी नेत्यांनी पलटवार केला असून केशव उपाध्याय यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
केशव उपाध्याय यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणाः
उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात अनेक वेळा फेसबुक लाईव्ह करत जनतेला संबोधलं होतं. यावरुन केशव उपाध्याय यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. एक नेता एक मैदान हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठीक होते, आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष तेवढच तर केल, असं केशव उपाध्याय म्हणाले.
पाहा ट्विटः
एक नेता एक मैदान हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठीक होते. आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष तेवढच तर केल
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 22, 2022
विशेष बाब म्हणदे उपाध्याय यांच्या या ट्विटवर अनेकांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन करत कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक कालच्या सभेतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत, आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आसमान दाखविल्या शिवाय राहणार नाही, असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे. मात्र, महाराजांचा इतिहास शिकत मोठे झालेल्या ठाकरेंना शिव जयंतीची तारीख लक्षात नसल्याने अनेक जण टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sandeep Deshpande | “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
- Atul Bhatkhalkar | उद्धव ठाकरे शिवजयंती विसरले अन् अतुल भातखळकर म्हणाले…
- BYD ATTO 3 Launch Date | ‘या’ दिवशी लॉंच होणार BYD ATTO 3 इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या!
- keshav upadhye | “पेंग्विन सेनाप्रमुखांना गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक कळत नाहीय”
- Jayant Dubale | कौतुक करावं तितकं कमी! नागपूरच्या जयंत दुबळेने इंग्लंड येथील नॉर्थ चॅनेल पोहून केला नवा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
