Share

गॅस पुन्हा भडकला : ‘महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी!’ चाकणकरांची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. मात्र अशातच सर्व सामान्य लोकांना  झटका बसला आहे. कारण आता पुन्हा एकदा आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकरणी सर्वसामान्य जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  यावर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत लिहिले की, आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार..! महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी !, अशा मार्मिक शब्दात रुपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमती बदलल्या जातात. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने आता सामन्यांच बजेट पुन्हा कोलमडणार आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडलेले असताना सतत होणारी वाढ यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!