लातूर: शहर महापालिकेच्या हद्दीतील व हद्दीबाहेरील नळधारकांकडे मार्च २०२१ अखेर ६३ कोटी रुपये पाणीपट्टी थकित आहेत. २०२०-२१ या वर्षात अवघी ७ कोटी ७२ लाख रुपये वसुली झाली आहे. पाणीपुरवठ्यावर महापालिका जेवढा खर्च करते, तेवढा खर्चही वसूल न झालेला नाही. मनपा आयुक्त अमन मित्तल हे लातूरकरांना दररोज अथवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात आहेत. त्यामुळे थकित पाणीपट्टीबद्दल ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
लातूर शहराला मांजरा धरणासह नागझरी व साई बंधाऱ्यावरील योजनांद्वारे ११ जलकुंभंतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांपासून अंतर्गत वितरण व्यवस्था सक्षम नसल्यामुळे सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मार्च २०१० पासून ते मार्च २०२० पर्यंत शहरातील ५५ हजार ९९६ नळधारकांकडे ६० कोटी ९१ लाख ५२ हजार ४१७ रुपये थकित आहेत. तर २०२०-२१ या वर्षाची पाणीपट्टी मागणी १० कोटी ५४ लाख २५ हजार ३२८ रुपये होती.
अशी एकूण ७१ कोटी ४५ लाख ७७ हजार ७४५ रुपये वसूल करण्यासाठी मार्च २०२० पासून जलकुंभनिहाय पथके तयार करुन वसुली करण्यात आली. त्यामध्ये मागील बाकीतील ६ कोटी १४ लाख ९६ हजार ३९९ रुपये वसूल झाले, तर २०२०-२१ या वर्षातील १ कोटी ५७ लाख ६८ हजार १७६ रुपये पाणीपट्टी वसूल झशली. म्हणजे, आणखी ६३ कोटी ७३ लाख १३ हजार १७० वसूल होणे बाकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस, तुला आम्ही चोप देणार’
- दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ? शिक्षणमंत्री गायकवाड यांची बैठक संपली
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- सरकार उगीच पाडता येत नाही, मंत्र्यांची कृत्ये देखील तशीच आहेत; राज ठाकरेंच सूचक विधान
- कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

