मुंबई : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जबरदस्त चकमक झाली असल्याची घटना घडली. बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील टेकुलगुडम- तर्रेम जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे. दुर्दैवाने या चकमकीत यामध्ये 24 जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता झाला आहे.
बीजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षविरोधी अभियानामध्ये एसटीएफ, डीआरबी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाचे ४०० जवान सहभागी झाले होते. शोध अभियानादरम्यान नारायणपूर येथे जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही बाजूने यावेळी तुफान गोळीबार झाला होता अशी माहिती मिळाली आहे.
मात्र अद्याप देखील नक्षल्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्र्वर सिंग मिनहास या जवानाला सुखरुप परत आणण्यासाठी मोदी सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे केवळ निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
नक्षल्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्र्वर सिंग मिनहास यांच्या सुटकेसाठी मोदी सरकार काहीच ठोस पावलं उचलताना दिसत नाहीये.
सत्तेच्या लालसेपायी देशाचा कारभार वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरणाऱ्या निवडणूकजिवी मोदी-शहांना जवानांच्या जिवाची जरा तरी किंमत आहे का? pic.twitter.com/JU4azcNsRz
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 6, 2021
‘नक्षल्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्र्वर सिंग मिनहास यांच्या सुटकेसाठी मोदी सरकार काहीच ठोस पावलं उचलताना दिसत नाहीये. सत्तेच्या लालसेपायी देशाचा कारभार वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरणाऱ्या निवडणूकजिवी मोदी-शहांना जवानांच्या जिवाची जरा तरी किंमत आहे का?, असा प्रश्न काँग्रेसने ट्विट करुन विचारलाय.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस, तुला आम्ही चोप देणार’
- दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ? शिक्षणमंत्री गायकवाड यांची बैठक संपली
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- सरकार उगीच पाडता येत नाही, मंत्र्यांची कृत्ये देखील तशीच आहेत; राज ठाकरेंच सूचक विधान
- कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

