🕒 1 min read
औरंंगाबाद : सिताफळाच्या फळबागेसाठी शासनाकडून मंजूर केलेल्या अनुदानाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून १ लाख ४५ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या गंगापूरच्या तालूका कृषी सहाय्यकास आणि त्याला मदत करणाऱ्या खासगी इसमास अ;ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.२७) रंगेहाथ पकडले. रविंद्र वांडेकर असे लाचखोर कृषी सहाय्यकाचे नाव आहे. तर किशोर कांडेकर असे त्याला मदत करणाऱ्या खासगी इसमाचे नाव आहे.
गंगापूर तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्याने सिताफळाच्या बागेसाठी महाराष्ट्र शासन प्रमाणित फळबाग अनुदान घेण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केला होता. शासनाने तक्रारदार शेतकऱ्याला सिताफळाच्या बागेसाठी अनुदान मंजूर केले होते. दरम्यान, गंगापुर तालुक्यातील जांभाळा येथील कृषी सहाय्यक रविंद्र वांडेकर यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे मंजूर केलेल्या अनुदानाचा मोबदला म्हणून १ लाख ४५ हजार रूपये लाच देण्याची मागणी २६ एप्रिल रोजी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अ;ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.
अ;ॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, पोलिस अंमलदार बाळासाहेब राठोड, अशोक नागरगोजे,रविंद्र काळे, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने सापळा रचून १ लाख ४५ हजाराची लाच स्विकारणा-या रविंद्र वांडेकर आणि त्याला मदत करणा-या किशोर कांडेकर यांना रंगेहाथ पकडले.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
