🕒 1 min read
मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना बुधवारी (दि.२९ जून) रोजी घडली.
पण त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी काल आढळून आल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व आणि मुख्य परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला होता. पण, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. याच नैराश्यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलले.
यावर आता राजकीय क्षेत्रातून देखील विविध प्रतिक्रिया येत असून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. नैराश्यातून समाजातील विविध व्यथित घटक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात,’ अशी आर्त हाक विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिली आहे. या युवकाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे असा आरोपही दरेकर यांनी केला.
‘पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले,’ अशी टिका दरेकर यांनी केली.
‘कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा, प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे आणि आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन परीक्षा व नोकरीसाठी तात्काळ उपाय योजना व अंमलबजावणी करा,’ अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांची निवड होईलच पण ‘या’ गोष्टीची काळजी – थोरात
- ‘गोपीचंद पडळकरांना कोल्हापुरात फिरू देणार नाही’; राष्ट्रवादी आक्रमक
- मराठा आक्रोश मोर्चा : ‘आता तारीख देणार नाही, थेट ऍटॅक करू’; नरेंद्र पाटलांचा इशारा
- …अन् आठवले म्हणाले, ‘त्यावेळी माझं जर फडणवीसांनी ऐकलं असतं तर ते आज मुख्यमंत्री असते’
- ‘एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी’ ; स्वप्निलच्या आईचा तळतळाट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
