औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणू संसर्गाची चाहूल लागल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मिनी लॉकडाऊन लागू केले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आक्षेप घेत त्यांच्या निर्णयात दोन दिवसांत बदल करावा असा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटम संपल्यानंतर मनसेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले असता. त्यांना बराच वेळ बाहेर थांबवण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण खुर्चीच्या मस्तीत आहेत. त्यांना जनतेची कोणतीही काळजी नाही. असा आरोप यावेळी मनसेने केला आहे.
२९ जूनपासून जिल्ह्यात सकाळी ७ दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहाराला परवानगी दिली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी आणि नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही १०० टक्के बंद आहे. सर्व काही सुरळीत झाल्याचे दिसत असतानाच पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियम, अटींचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्णयात दोन दिवसांत बदल करावा असा अल्टिमेटम त्यांनी दिला होता.
हा अल्टिमेटम शुक्रवारी (दि.२) संपला. या लॉकडाऊनमध्ये सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुट देण्यात यावी या मागणीसाठी मनसे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे आणि शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेले असता बराच वेळ त्यांना बाहेर बसवण्यात आले. अखेर निवेदन न देता शिष्टमंडळ माघारी फिरले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक त्यांना थांबवण्यासाठी आले, मात्र जिल्हाधिकार्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही सोयरसुतक नाही, हे जिल्हाधिकारी खुर्चीच्या मस्तीत आहे. त्यांना जनतेची कोणतीही काळजी नाही. ते सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाले आहेत. असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे, शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार व संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- १५ हजार लसींचा साठा दोनच दिवसात संपला! औरंगाबादेत जम्बो लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक
- पीएचडी परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, ऑनलाइन नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ!
- औरंगाबादकरांना आठवड्यातून दोनदा पाणी, पालकमंत्र्यांची घोषणा ठरली निव्वळ स्टंटबाजी!
- मराठा आक्रोश मोर्चा : ‘आता तारीख देणार नाही, थेट ऍटॅक करू’; नरेंद्र पाटलांचा इशारा
- केंद्र सरकारशी पंगा अंगलट ; ट्विटर विरोधात पाचवा गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

