Share

पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये राडा, एकाचा मृत्यू

Published On: 

पुणे : कालच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा टाकण्यात आला होता. त्याची चौकशी चालू असतानाच उरली कांचन मध्ये आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अस्सल गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली. ही घटना तळवेडे चौकात घडली. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. या गोष्टीमुळे पुण्यातील गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काल महाराष्ट्र बँक पिंपरखेड येथील शाखेवर ५ ते ६ दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून बँकेतील सर्व सोने आणि रोकड लुटून नेली. अशातच आज उरुळी कांचन येथे दोन गुन्हेगार टोळींमध्ये पूर्ववैमनस्यातून भरदिवसा गोळीबार करण्यात आला. यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळीयुद्ध भडकल्याचे समजते आहे.

अप्पा लोंढे गँग आणि विरुद्ध असलेल्या टोळीमध्ये ही फायरिंग झाली असे म्हंटले जात आहे. यामध्ये संतोष जगताप याचा फायरिंग दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नेमका गोळीबार हा कोणत्या कारणामुळे झाला हे अजून पर्यंत स्पष्ट झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!