Share

‘आघाडीवर नाराज अन् भाजपवर खुश असं काही नाही; जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझं धोरण’

Published On: 

पुणे : १९ ऑक्टोबरला जयसिंगपूरला ऊस परिषद झाली. त्यात काही ठराव झाले त्याची प्रत आयुक्तांना देण्यात आली. साखर कारखान्यांना एक रकमी एफआरपी देण्यात यावी. डिसेंबरमध्ये तीन हजार तीनशे एवढी द्यावी व राहिलेली रक्कम जानेवारी पर्यंत द्यावी. ती तुकड्या तुकड्यात दिला जाते. १३ महिने पैसे राहतात त्याच्या व्याजाच काय झाल? असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारने साखरेचे भाव ३७ रुपये करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधित कागदपत्रे ईडी समोर सादर केली. यावेळी कारखान्याचे तत्कालीन पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी देखील भूमिका मांडली आहे. साखर आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी म्हणून शेट्टी शुक्रवारी दुपारी पुणे येथे आले होते.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, फक्त जरंडेश्वरच नाही अनेक कारखाने आहेत. सगळे सारखेच आहेत, पण सोयीचे तेवढे काढायचे बाकीच्या झाकायचे असा प्रकार सुरू आहे. आपण सुरूवातीपासूनच या व्यवहारांबाबत ओरडत होतो असे स्पष्ट करून शेट्टी म्हणाले, फक्त जरंडेश्वरच टार्गेट का याचे ऊत्तर आरोप करणार्या किरीट सोमय्या यांनी द्यावे. गैरव्यवहार झालेल्या कारखान्यांची यादी मोठी आहे, सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत. मी महाविकास आघाडीवर नाराज अन् भाजपा सरकारवर खुश अस काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार, जो आडवा येईल, त्याला तुडवायचं हेच माझे धोरण आहे अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!