औरंगाबाद : शिवसेना महिला आघाडी पक्ष संघटन मजबुतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून औरंगाबादेत शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २१) औरंगाबाद पश्चिम ग्रामीणची बैठक अतिशय उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत महिला आघाडीच्या सर्वच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी वाॅर्डावाॅर्डात, घरोघरी जाऊन शिवसेना पक्षाचे विचार, लोकप्रतिनिधींच्या मार्फत होणारी विकास कामे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून संघटना बळकट करण्याचा वज्रनिर्धार केला.
आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. क्रीडा, बँकिंग, आय. टी इत्यादी क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करताना आपण पाहतो. या बरोबरच समाजाचेही आपल्याला काही देणे लागते या हेतूने महिलांची सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घ्यायला हवी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना ८० टक्के समाजकारण तर २० च टक्के राजकारण अपेक्षित होते. त्यामुळे महिलांनी समाजकारणात पुढे यावे. असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी केले.
पक्ष संघटन मजबुतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद जिल्ह्यात बैठकांचे सत्र सुरू आहे याप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासा! ..तर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळणार
- ‘उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार हेक्टरी मदत देऊन दाखवावी’, हरिभाऊ बागडेंचे आव्हान
- मोठी बातमी! हसन मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडणार
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘निजामकालीन शाळांच्या विकासकामांची तत्काळ अंमलबजावणी करा’, मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

