Share

‘तुमची पंधरा काम आणि माझं एकच काम, ते करा’, अशोक चव्हाणांचे मतदारांना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जाहीर सभा देगलूर-बिलोली येथे आयोजित करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मतदारांना आवाहन केले. ‘तुमची पंधरा कामं, आणि माझ एकच काम, ते करा आणि सर्व कामे माझ्यावर सोपवा, असे आवाहन त्यांनी केले.

देगलूर पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारसभेत आज शुक्रवारी डोणगाव येथे ते बोलत होते. ‘लोकसभा निवडणुकीत तुमच्या गावातून मी मागे होतो. रावसाहेब अंतापूरकर मात्र ११० मतांनी लीडवर होते. मला मत दिले नाही, म्हणून मी तुमच्यावर नाराज नाही. पण आता ती चूक पुन्हा करू नका. कोणाच्याही नादाला न लागता पंजाला मतदान करा, शेवटी तुमची कामे मीच करणार आहे. तुमच्या कामांची यादी माझ्या खिशात आहे. मतपेटी उघडली की ही चिठ्ठी बाहेर काढणार’ असे ते यावेळी म्हणाले.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण यांनी डोणगाव येथे आज सभा घेतली. ‘तुमचे मत वाया घालवू नका, लोकसभेला भाजपाने आपल्यात भांडणं लावली. यशवंत भिंगेंना माझ्या विरोधात उभे केले. पण, याने कुणाचा फायदा होत नाही. हे त्यांच्याही लक्षात आले आणि म्हणून आज ते आमच्यासोबत आहेत. भाजपामध्ये आता कुणी राहायला तयार नाही. भास्करराव खतगावकरही त्यांच्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये आलेत. १५ कामांच्या यादींमधून महत्त्वाची कामे निवडणूक आचारसंहिता संपली, की बैठक घेऊन मार्गी लावतो. पण जितेशला प्रचंड मतांनी निवडून द्या’ असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!