Share

बस ड्रायव्हरच्या अवतारानंतर आता नवी वेश घेत माही म्हणाला “अब बहानेबाजी नॉर्मल है”

Published On: 

मुंबई: आयपीएल स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी असताना त्याचे प्रोमो यायला सुरुवात झाली आहे. तसेच या प्रोमोमध्ये महेंद्रसिंह धोनी वेगळ्या अवतारात दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नवा अवतार त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. बस ड्रायव्हरनंतर आता धोनी घरातील ज्येष्ठ सदस्य बनला आहे. तो या नव्या प्रोमोमध्ये हटके अंदाजात दिसत आहे.

आयपीएलने (IPL 2022) जारी केलेल्या या नव्या प्रोमोमध्ये धोनी (MS Dhoni) घरातील वयस्कर सदस्य बनला आहे. जेव्हा त्याच्या घरचा टेलिफोन वाजतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासह सामना पाहत असतो. त्याचा मुलगा फोन उचलायला पुढे जातो, पण धोनी त्याला थांबवतो आणि सुनेला फोन उचलायला सांगतो. सून फोन उचलते तेव्हा कळते की कोणालातरी धोनीशी बोलायचे आहे. यावर धोनीने आपले निधन झाल्याचे हातवारे करतो. आणि सून, रडण्याचे नाटक करत, धोनी नाही असे खोटे बोलते आणि फोन ठेवते. ज्याच्या शेवटी धोनी म्हणतो ” ऐसी अब बहानेबाजी अब नॉर्मल है ” ( अशी बहानेबाजी आता नॉर्मल आहे) हा प्रोमो (IPL Promo) आणि धोनीचा अवतार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Caw2LVBlcbW/?utm_source=ig_web_copy_link

IPL 2022 २६ मार्चपासून सुरू होत आहे. यावेळीही धोनी चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. बीसीसीआयने सर्व साखळी सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. सर्व साखळी सामने मुंबई आणि पुण्यातील चार मैदानांवर खेळवले जातील. त्याच वेळी, प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. धोनीचा संघ चेन्नई चार वेळा या स्पर्धेचा चॅम्पियन बनला आहे. तसेच माही सध्या चेन्नई संघासोबत सुरत येथे स्पर्धेची तयारी करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!