🕒 1 min read
पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती मंडळाच्या गणपतीचं देखील काही वेळेपूर्वीच विसर्जन करण्यात आले आहे . या गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी 11.15 वा. टिळक पुतळ्यापासुन सुरूवात झाली होती.
ढोल-ताशा पथकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लक्षवेधी बँड पथक आदींनी ही मिरवणूक मंडईतून प्रस्थान करून नंतर लक्ष्मीरोड मार्गे अलका चौकात दाखल होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मात्र प्रचंड उत्साहात मिरवणुकीचा जल्लोष पाहिला मिळतो. मिरवणुकीत लोणकर बंधुचे नगारावादन, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकांचा समावेश होता. गरूडाच्या आकाराचा फुलांचा आकर्षक रथामध्ये ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान होती.सायंकाळी ठीक वा. हौदात विसर्जन करण्यात आले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

