मुंबई : काल शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली वारीवर येणार होते. स्वारीवर नाही. गेल्या महिन्याभरातली त्यांची ही ५वी दिल्ली भेट आहे, असा टोला राऊतांनी लगावला.
शिवसेनेचे मुख्यमंत्री जर कोण म्हणून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावे लागले नाही. शिवसेनेचे हाय कमांड हे कायम मुंबई मध्येच राहिल्या. दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. मंत्री मंडळाची स्थापना अद्याप होऊ शकली नाही.एक महिना झाला तरी दोघांचेच कॅबिनेट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ३ महिन्या पासून खेळ खंडोबा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shah and Eknath Shinde : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार?
- Sanjay Raut | “महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल” ; संजय राऊतांचे मोठे विधान
- Amol Mitkari | शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही – अमोल मिटकरी
- Sanjay Raut : पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको – संजय राऊत
- Suraj Vashishth | युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने रचला इतिहास; 32 वर्षांनंतर जिंकले गोल्ड मेडल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

