महाराष्ट्र देशा डेस्क : भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठ याने अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कुस्तीच्या ५५ किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे. सुरजने अंतिम सामन्यात अझरबैजानच्या फारिम मुस्तफायेवचा 11-0 असा पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज हा तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे. या प्रकारात यापूर्वी कुस्तीपटू पप्पू यादव यांनी 32 वर्षांपूर्वी देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे आजचा दिवस भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे.
सूरज ???????? ने रचा इतिहास। भारत का 32 साल बाद U17 विश्व चैंपियनशिप में स्वर्ण पदक ????।#wrestlerome pic.twitter.com/cMh8qaIJMt
— United World Wrestling (@wrestling) July 27, 2022
या मॅचमध्ये सुरजने खूपच आक्रमक सुरुवात केली. त्याने शेवट्पर्यंत त्यांची आक्रमकता टिकवून ठेवली. त्याच्याच जोरावर तो अझरबैजानच्या कुस्तीपटूवर भारी पडला. सूरजच्या विजयाबद्दल अनेक जण त्याचे अभिनंदन आणि कौतुक करत आहेत. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजचे अभिनंदन केले. त्याने सूरजचा फोटो ट्विट करून लिहिले की, “सूरजने इतिहास रचला. 32 वर्षांनंतर अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला सुवर्णपदक मिळाले. खूप अभिनंदन, असंच देशासाठी मेडल्स निकट राहा.”
सूरज ने रचा इतिहास। 32 साल बाद देश को दिलाया U17 विश्व चैंपियनशिप में स्वर्ण पदक ????। बहुत बहुत बधाई छोटे भाई आपको और ऐसे ही आगे बड़ते रहो और देश के लिए मेडल जीतें रहो । ???? जय हिन्द pic.twitter.com/QpkkzpwQJF
— Bajrang Punia ???????? (@BajrangPunia) July 28, 2022
सुरजने तब्बल 32 वर्षांनंतर या स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. यापूर्वी 1990 मध्ये पप्पू यांनी सुवर्णपदक पटकावले होते. हे या स्पर्धेतील भारतासाठीचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. पप्पू यांच्या आधी कुस्तीपटू विनोद कुमार यांनी 1980 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळेच 17 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत सूरजचा हा विजय अतिशय ऐतिहासिक आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar : एवढं मोठं बहुमत मिळालं आहे, मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाही?, अजित पवारांचा सवाल
- Shivsena : ‘प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार …’ सेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप
- Samana : उद्धव ठाकरे यांनी एक मुलाखत काय दिली, अन् राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले
- Sandipan Bhumre : ‘हो एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख व्हायचेय’,पण…; संदिपान भूमरे स्पष्टचं बोलले
- Vinayak Raut : “शिंदे-फडणवीस यांच्या शुभेच्छांना आम्ही किंमत देत नाही”; विनायक राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

