Share

अवैधरित्या कारमधुन देशी दारूची वाहतूक करणारा गजाआड, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: 

औरंंगाबाद : अवैधरित्?या देशी दारुची वाहतूक करणा-या एकाला राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. संतोष दगडुबा जुंबड (वय ३१, रा. वाघ्रुळ, डोंगरगाव ता. बदनापुर जि. जालना) असे अटकेत असलेल्या दारूची वाहतूक करणा-याचे नाव असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्याच्या ताब्यातून १ लाख ८०० रूपये किंमतीची दारू आणि एक कार असा एकूण ३ लाख ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथकाचे शेख निसार शेख सरदार हे १८ मे रोजी सायंकाळी पथकातील सहकार्यांसह गस्तीवर असतांना बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेज समोर कार क्रमांक (एमएच-२०-ईजी-३८७५) अडवली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संतोष जुंबड याला ताब्यात घेत कारची झडती घेतली असता त्यामध्ये १ लाख ८०० रूपये किंमतीचे देशी दारूचे बॉक्स मिळून आले.

याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात संतोष जुंबड विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संतोष जुंबड याला न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच.जोशी यांनी गुरूवारपर्यंत गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!