Share

बारामतीहून चोरलेला ट्रॅक्टर विक्रीसाठी शहरात आणणारा गजाआड

Published On: 

औरंंगाबाद : बारामतीहून ट्रॅक्टर चोरुन औरंगाबादेत विक्रीसाठी घेऊन आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकाला एमआयडीसी सिडको पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी (दि.२०) सकाळी ९ वाजेच्या सुमारास नारेगाव कचरा डेपो परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, अंकुश संतोष सरदड (रा. देवपूर बुलढाणा, जि. बुलढाणा) असे चोरीचा ट्रॅक्टर विक्रीसाठी आणणार्याचे नाव आहे.

नारेगाव कचरा डेपो येथे चोरीचा ट्रॅक्टर विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरनाथ नागरे, मुनीर पठाण, दिपक शिंदे, नितेश सुंदर्डे यांच्या पथकाने सापळा रचून विना ट्रॉलीचा ट्रॅक्टर क्रमांक (एमएच-४४-वाय-५४९६) नारेगाव कचरा डेपोजवळ अडवून चालकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी ट्रॅक्टर चालक अंकूश सरदड याला ट्रॅक्टरच्या कागदपत्राविषयी विचारले असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी खाक्या दाखविताच अंकूश सरदड याने सदरील ट्रॅक्टर बारामती येथील रविंद्र सावंत यांच्या मालकीचा असून तो चोरी करुन विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. तसेच ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या मालेगाव-मुंबई रोडवर बेवारस अवस्थेत सोडल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

एमआयडीसी सिडको पोलिसांनी बारामती येथील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याशी संपर्क केला असता, अभिजीत बालगुडे (रा. वाकी, ता. बारामती) यांनी ट्रॅक्टर चोरी केल्याची फिर्याद दिली असल्याचे सांगितले. ट्रॅक्टर चोरणार्या अंकूश सरदड याला सायंकाळी बारामती येथील वडगाव निंबाळकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!