Share

गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; पोलीस महासंचालकांना दिले ‘हे’ आदेश

Published On: 

मुंबई : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात देखील त्यांनी महाराष्ट्रासाठी खास प्रयत्न करून संकटात मोठी मदत केली होती. तर, त्यांच्या रस्ते बांधणीच्या विक्रमी नोंदीमुळे ते आता ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जात आहेत. फारसे कधी न संतपणारे गडकरी आता मात्र शिवसेनेच्या दहशत पसरवणाऱ्या कारवायांमुळे चांगलेच संतापले आहेत.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या स्फोटक पत्रानंतर एकच खळबळ उडाली आहे. गडकरींच्याच्या या पत्राची मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील तात्काळ दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. यात त्यांनी कत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची आणि त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांची माहिती मागितली आहे.

राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी गडकरींच्या पत्राचा संदर्भ देत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय. याबाबत ते म्हणतात, ‘केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 25 जुलै रोजी एक पत्र लिहिले आहे. ते सोबत पाठवले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातील काही महामार्गाचे काम पूर्ण झालेत, तर काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांमध्ये काम सुरू असताना काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत. विविध नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भांडावून सोडणे आणि त्यांनी न ऐकल्यास काम बंद पाडत असल्याचं पत्रात म्हटलं आहे.’

gruh upsachiv letter

‘वरील प्रकरणी आपल्याकडे कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींविरुद्ध केलेल्या तक्रार अर्ज आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले आहेत का? तसेच याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ उपलब्ध करुन द्यावा,’ असा आदेश गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी पोलीस महासंचालक यांना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!