नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात देखील त्यांनी महाराष्ट्रासाठी खास प्रयत्न करून संकटात मोठी मदत केली होती. तर, त्यांच्या रस्ते बांधणीच्या विक्रमी नोंदीमुळे ते आता ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जात आहेत. फारसे कधी न संतपणारे गडकरी आता मात्र शिवसेनेच्या दहशत पसरवणाऱ्या कारवायांमुळे चांगलेच संतापले आहेत.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांना लिहिलेल्या स्फोटक पत्रानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेनेतील नेते देखील प्रतिक्रिया देत असून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘माननीय नितीन गडकरी यांचा पूर्ण आदर आहे, पण त्यांनी शिवसेना शब्द वापरण्याऐवजी त्या एका विशिष्ट भागाचा उल्लेख केला असता, तर बरं झालं असतं. पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा उल्लेख केला. जणू काही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे, असा सूर त्या पत्रातून व्यक्त होतोय, ते गैर आहे असं मला वाटते,’ असं सावंत म्हणाले.
यासोबतच, ‘शिवसेना का म्हणता? मुंबई गोवा रोड आम्ही करतोय का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्याबरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का?,’ असा सवाल उपस्थित करत सावंत यांनी नितेश राणे आणि भाजपवर देखील निशाणा साधला आहे. तर, ‘विकासाच्या कामाला कुणी विरोध करता कामा नये ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची न्याय भूमिका आहे आणि ते त्यापद्धतीने न्याय देतील,’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- आमदारांच्या नियुक्तीवरून हायकोर्टाच्या सुनावणीनंतर राज्यपाल कोश्यारी अमित शाहांच्या भेटीला
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; पोलीस महासंचालकांना दिले ‘हे’ आदेश
- नितीन गडकरींच्या स्फोटक पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया !
- ‘जसं 370 कलम हटवलं, तसंच…’; संजय राऊत यांची थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी


