टीम महाराष्ट्र देशा : आमचे राजकारणी हरले की, आम्हाला हरवलं गेल असं सांगतात. आपण कुठं कमी पडलो हे ते बोलत नाहीत. दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है, लेकिन झुकानेवाला चाहिए, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वकीयांना मोलाचा सल्ला दिला आहे. औरंगाबादेत औद्योगिक प्रदर्शनाला गडकरींनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
पुढे गडकरी म्हणाले की, ‘कटआऊट लावून कुणी नेता होत नाही, मी आयुष्यात कधीही कटआऊट लावले नाही. तुमच्याकडे दर्जा असेल तर लोक तुमच्या सोबत असतील. राजकारणात सुद्धा असंच आहे. ‘
मी जॉर्ज फर्नांडिस यांना आदर्श मानतो. मी विजयी झालो, तर माझ्या स्वागताला कुत्रं पण येत नाही. विमानतळावर स्वागताला यायची काय गरज आहे? मी माझ्या आयुष्यात २० रुपये खर्चून एकही बॅनर लावलं नाही, असंही गडकरींनी नमूद केलं.
आपल्या देशाचा विकास होत असताना सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असे आपण म्हणतो. तशी आर्थिक समानता सुद्धा तयार झाली पाहिजे , त्यामुळे गरीब पीडित माणसाला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरणे ठरवली पाहिजेत.आपल्या देशात गरिबी कमी करायची असेल तर रोजगार उपलब्ध केले पाहिजेत. असही ते म्हणाले.
टेक्नोलॉजीचा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे. यातून मानवी जीवन अधिक सुखकर होईल. देशात ७ लाख कोटी रुपयांचं इंधन आयात केलं जातं. आपल्याकडचा शेतकरी जट्रोफाच्या रुपाने पर्यायी इंधन निर्मिती करत आहे. जट्रोफाच्या पेट्रोलवर आपल्या देशात जेट विमानाचे डेमो चाचणी यशस्वी झाले असल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.


