Share

‘यशवंत पंचायतराज’मध्ये हिंगोलीची उत्कृष्ट कामगिरी; पुणे आयुक्तलयाचे पथक आज हिंगोलीत

Published On: 

हिंगोली : यशवंत पंचायतराज अभियानामध्ये हिंगोली जिल्हा परिषदेने विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता राज्यस्तरीय तपासणीसाठी पुणे आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त राजाराम झेंडे, सांगली ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांचे पथक ता. १ मार्च रोजी हिंगोली जिल्हा परिषदेला भेट देणार आहे.

पंचायतराज संस्थांचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने मागील आर्थिक वर्षात सर्व योजनांची परिणामकारक अंमलबजावणी केली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी, डॉ. मिलिंद पोहरे, गणेश वाघ, आत्माराम बोंद्रे यांच्यासह विभाग प्रमुखांनी शासनाच्या योजनांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याची अंमलबजावणी केली. या शिवाय जिल्हा परिषदेला शासनाकडून विभागनिहाय प्राप्त झालेला निधी तसेच खर्च झालेला निधी याचा आढावा घेऊन हा निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागांकडे पाठपुरावा केला होता. याबाबत परभणी येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील पंधरवड्यात विभागस्तरावरील तपासणी केली होती.

प्रत्येक आर्थिक वर्षासाठी पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन, विकास कार्यात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्राम पंचायतींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकीय कामकाज, सभा कामकाज, कर्मचारी सेवा, निलंबन, निवृत्ती वेतन व लोकायुक्त प्रकरणे, महिला, बालकल्याण, आरोग्य, जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, समाजकल्याण, वित्त, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, शिक्षण या सर्व विभागाकडील योजना, विकासकामांच्या झालेल्या कामकाजाच्या आधारे मूल्यमापन करण्यात येते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!