Share

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जातं, पण सध्या पुण्यासह राज्यभरात हे इंजेक्शन कुठेच मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे.

त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईंकांची या महागड्या इंजेक्शनसाठी फरफट सुरू झाली. एका पेशंट्साठी दिवसाला किमान पाच ते सात याचे डोस द्यावे लागतात. पण अचानक मागणी वाढल्याने सध्या कुठेच हे इंजेक्शन उपलब्ध नाहीय. सध्या राज्यात एकुण २ हजार ४४५ पेशंट्स उपचार घेत असून एम्फोटेसीरीन बी या इंजेक्शनची डिमांड वाढत आहे.

या एका इंजेक्शन कोर्सचा एका पेशंट्ससाठीचा खर्चच किमान सात लाखांपर्यंत जातोय, तर इतर खर्च धरून म्युकरमायकोसीसचा एका क्रिटिकल पेशंट्सचे बिल वीस ते पंचवीस लाखांच्या घरात जात असल्याचं सांगितलं जातं. बरं एवढं करूनही काही रूग्णांना त्यांचा डोळा, जबडा असे गमवावे लागत आहेत. यावरून हा म्युकरमायकोसीसचा संसर्ग किती महाभयंकर बनलाय, हे सहज स्पष्ट होत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिसवर उपचार करणाऱ्या 131 रुग्णालयांची यादी प्रसिध्द करुन, म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करु. कोरोनासह म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!