🕒 1 min read
मुंबई : टीव्हीवरील प्रेक्षकांच्या सर्वात आवडता रिअलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’ हिंदी बिग बॉस हिट झाल्यानंतर मराठीतून बिग बॉसला सुरुवात झाली. बिग बॉस सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी त्याला चांगलंच डोक्यावर घेतलं. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सीजन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
https://www.instagram.com/p/CT_XqQBII2o/?utm_source=ig_web_copy_link
यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’ मध्ये काय वेगळे पाहायला मिळणार याबाबतची माहिती आता समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या लाइव्ह इव्हेंटमध्ये नुकताच याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. हा सीझन तब्बल १४ आठवडे ९९ दिवस चालणार आहे. तसेच विशेष म्हणजे आतापर्यंत होत असलेल्या वीकेंड का वार हि कन्सेप्ट नसणार आहे. त्याजागी आता ‘बिग बॉस चावडी’ भरवण्यात येणार आहे.
आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३०वा. कलर्स मराठीवर प्रक्षेपित होणार आहे. त्यामुळे हा शो पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना काही तासच वाट पाहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमचे अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
