Share

एक जूनपासून राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाची हाक !

Published On: 

पालघर: शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात एक जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या ज्वलंत मागण्यांसाठी १ जून २०१७ रोजी राज्यात शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संपाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. दुधाला किमान २७ रुपये भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी शेतकरी पुन्हा एकदा लढा देणार आहेत.

जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये खाटी जनावरे बांधून आणि सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून प्रहार, किसान सभा आणि लाख गंगा आंदोलक लढण्यास तयार झाले आहेत. यावेळी डॉ. अजित नवले, आ. बच्चू कडू, धनंजय धोरडे यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.

या आंदोलनाची सरकारने रास्त दखल न घेतल्यास समविचारी शेतकरी संघटनांना बरोबर घेत आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे किसान सभेने स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालीही आंदोलन झालं. यामध्ये कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, दूध प्रश्न, बोंड अळी, जमिनीचे हक्क, पिक विमा या संदर्भात अनेक आंदोलने झाली. मात्र सरकारने फक्त आश्वासनाचे गाजर दिले. अमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी लढा उभारणार आहेत.

किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी.गावित, किसन गुजर आदींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक

  • शेतकरी संप आणि ऐतिहासिक लॉंग मार्चला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या
  • शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भावाची हमी देणारा कायदा करा,
  • दुधाला किमान २७ रुपये भाव मिळावा
  • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
  • कीटकनाशके, बियाणे आणि शेती आदाने निर्माते तसंच विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुटमार रोखण्यासाठी कडक उपाय योजना करा
  • स्वस्त दरात शेती आदाने उपलब्ध करुन द्या
  • वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करुन कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी कसणारांच्या नावे करा
  • कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन द्या आणि शेतकऱ्यांसाठी पीक, पशू आणि कुटुंब आरोग्य विम्याचे सर्वंकष संरक्षण द्या
  • आकारी पड जमिनीचा प्रश्न सोडवा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!