औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात प्रिâ स्टाईल हाणामारी झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी रांजणगांव फाटा येथे घडली.
या हाणामारीत निलेश पुरूषोत्तम ठोके, शिवम सोपान पांढरे, अवकाश पंकज मिश्रा, नितीन विनायक बन, गणेश भाऊसाहेब दांडेकर, तुळशीराम रामनाथ जाधव, खान रहिम खान, गिरीश केशवराव, नंदु गोस्वामी, विकास कोळी, शैलेश राठोड, अक्षय पडघन, कडुबा वाघ हे जखमी झाले आहेत. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
फावड्याने शेजा-याला मारहाण
दुसऱ्या घटनेत तुम्ही आमच्या घरासमोर बोअर का घेतला असे म्हणत तीन जणांनी युसूफ खान महेबुब खान (रा.पडेगाव) यांना शिवीगाळ करून फावड्याने मारहाण केली. ही घटना १९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी युसूफ खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून सलमान खान, इमरान खान, मोकीद खान (सर्व रा.पडेगाव) यांच्याविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी
- घटना दुर्देवी! यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्यावी-रामदास आठवले
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला


