🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र सरकारने गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – बंगळूरु आणि मुंबई – गोवा महामार्गावरील टोल नाके तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवरील टोल 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत माफ केले आहेत. यानंतर आता मुंबई महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळणे शुक्रवारपासून 75 वर्षांवरील लोक त्यांच्या बसमधून मोफत प्रवास करू शकतात, अशी घोषणा केली आहे.
मोफत प्रवास योजनाः
एम एस आर टी सी ( MSRTC) मध्ये राज्य परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक यांचा अहवाला देत मोफत प्रवास योजनेसाठी पात्र असलेल्यांनी 26 ऑगस्ट पूर्वी त्यांची तिकीट बुक केली असल्यास त्यांना भाड्याची रक्कम परत मिळेल, असं म्हटलं आहे. तसेच 65 ते 75 वर्ष वयोगटातील लोकांना उपक्रमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बस सेवांवर तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत मिळेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणाः
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसारखी ओळखपत्र दाखवून मोफत प्रवास सुविधाचा लाभ घेता येईल. या नव्या सुविधाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केली होती. एमएसआरटीसी कडे 16000 होऊन अधिक बसेस आहेत आणि मार्च 2020 मध्ये कोविड-19 महामारी सुरू होण्यापूर्वी सुमारे 65 लाख लोक दररोज या बसमधून प्रवास करत होते.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर रस्त्यांवरील टोल बाबतच्या सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या विविध भागातून कोकण किनारपट्टीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या गणपती भक्तांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- IND vs PAK | “माझ्या हातात असते तर…” ; सामना सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर रोहित शर्माचे मोठे विधान
- Karuna Munde | 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी करुणा मुंडे यांनी नोंदवला गुन्हा, आरोपी धनंजय मुंडेंच्या परिचयाचे
- Rohit Pawar | राकेश वाधवान मनी लॉन्डरिंग प्रकरणी रोहित पवार अडकणार ? पवार ED च्या रडारवर
- Narendra Modi | गुजरात दौऱ्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यांच्या आईची भेट
- India vs Pakistan | सामन्यापूर्वीच पाक संघाला भारताचा धाक! पाकिस्तानी माजी गोलंदाजाचं मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
