Share

उदगीरात उपासमारीच्या काळात गरजूंना मोफत जेवणाचे पार्सल!

Published On: 

लातूर: कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सगळीकडे संचारबंदी असल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तसेच ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर तर आर्थिक संकटच ओढवले आहे. जेवायची सोय देखील अनेकांना करता येत नाहीये. सकाळी खाल्लं तर रात्रीचा प्रश्न त्यांना पडलेला असतो. अशात मदती साठी सामाजिक कार्यकर्ते पुढे येत आहेत. असेच उदगीर येथे देखील सामाजिक कार्यकर्ते अलीमोद्दिन उस्मान शेख यांनी गरजूंना मोफत जेवण पार्सल देण्याचा उपक्रम राबवला आहे.

कोरोनाचा झपाट्याने वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कठोर निर्बंधासह लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन काळात सर्व हॉटेल्स बंद असल्याने अनेकांची उपासमार होत आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते अलिमोद्दिन उस्मान शेख यांनी संपूर्ण लॉकडाऊन काळात गरजूंना मोफत जेवणाचे पार्सल देऊन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.

उदगीर शहरातील सर्वच हॉटेल्स लॉकडाऊन मुळे बंद आहेत. उदगीरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी १५ ठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. या उपचार केंद्रात उदगीर तालुक्यातील, लातूर जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल झालेली आहेत. या रुग्णांसोबत असणाऱ्या नातलगांची सर्व हॉटेल्स बंद असल्याने उपासमार होत असल्याचे, येथील रोटी कपडा बँकेचे सदस्य अलिमोद्दिन शेख यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लॉक डाऊनच्या पूर्ण काळामध्ये गरजूंना स्वखर्चातून मोफत जेवणाचे पार्सल देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार शहर पोलिस स्टेशन समोर एक टेन्ट उभारून तेथून गरजू नागरिकांना मोफत जेवणाचे पार्सल देण्याची सोय केलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!