औरंंगाबाद : अल्पवयीन मुलगी व तिचा लहान भाऊ घरात असतांना घरात घुसून मुलीला मोबाइल क्रमांक आणि आय लय यू ची चिठ्ठी देणा-या एचडीएफसी बँकेच्या कर्जाचे हप्ते वसुल करणा-या अण्णा सांडू शेजूळ (वय ३०, रा.मयुरपार्क ) याला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी. परदेशी यांनी शुक्रवारी (दि.१४) दिले.
पीडित १३ वर्षीय मुलीची आई धुन्या-भांडयाचे काम करते तर वडील पीठाची गिरणी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पीडित मुलीच्या आईने बचत गटाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यामुळे बचतगटाची मिटींग व कर्जाच्या हप्त्याच्या अनुषंगाने बँकेचे अधिकारीव अण्णा शेजूळ हे पीडित मुलीच्या घरी नेहमी येत होते. १३ मे रोजी पीडित मुलीची आई व वडील कामावर गेले होते. त्यावेळी पीडिता व तिचा लहान भाऊ असे दोघे घरीच होते.
त्यावेळी अण्णा शेजूळ हा पीडितेच्या घरी आला व त्याने डायरीतील पान फाडून त्यावर त्याचा मोबाईल नंबर व आय लव यु लिहलेली चिठ्ठी लिहुन पीडित मुलीकडे दिली. पीडित मुलीने त्याला जाब विचारून घरातून बाहेर जाण्याचे सांगत घराजवळ राहणा-या काकूला आवाज दिला, त्यामुळे घाबरलेल्या अण्णा शेजुळ याने पीडित मुलीचा हात पकडला असता, पीडितेने त्याच्या हाताला हिसका मारून बाहेर गल्लीत धुम ठोकली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अण्णा शेजुळ याच्याविरूध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहरासाठी २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करा, खंडपीठाचे निर्देश
- कोरोना नंतर म्युकरमायकोसीस आजार; प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीकोन हवा- आ. निलंगेकर
- मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
- चक्रीवादळाचे रौद्ररूप : केरळातील अनेक घरे जमीनदोस्त, कोकणात समुद्र खवळला
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

