उस्मानाबाद: महिला को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मुदत ठेव ठेवलेल्या पाच जणांची २३ लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी ठेवीदारांनी भूम पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे खातेदार, ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस काय कार्यवाही करणार? याकडे लक्ष वेधले आहे. हा सर्व प्रकार काही महिन्यापासून चालू होता २३ लाख रूपयांची फसवणूक यात पाच जणांनी २३ लाखांची ठेवी केली होती आता परतावा साठी वारंवार मागणी करुन ही आपले पैसे मीळत नसल्याने शेवटी भूम पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे तसेच महिला सोसायटीच्या नावाखाली हा सगळा प्रकार चालू आहे.
दरम्यान, पाच जणांनी याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, भूम तालुक्यातील जांब येथील प्रा. रामभाऊ वामनराव जोगदंड हा विविध व्यवसायानिमित्त १० ते १५ वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्याने ७ ते ८ वर्षांपासून सूरज अर्बन महिला को ऑपरेटिव्ह लि भूम या नावाने पतसंस्था चालू केली. पतसंस्थेत जांब येथील केशव सूर्यकांत जोशी यांनी १३ महिन्याच्या मुदतीने २ लाख ८० हजार रुपये, रामचंद्र लक्ष्मण जोशी यांनी ५ लाखाची मुदत ठेव तर २ लाख ५० हजार ४४५ रुपयांची रक्कम बचत खात्यावर टाकली होती.
सुनील जोगदंड यांनी स्वत:च्या नावे ५ लाख रुपये मुदत ठेव योजनते गुंतवलेले आहेत. या पाच जणांचे मिळून २३ लाख १२ हजार ४४५ रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत. त्यामुळे या ठेवीदारांनी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये आणि आपले फसवणूक झालेले २३ लाख परत मिळ्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गोकुळ’चा रणसंग्राम : गोकुळमधून लुटलेल्या पैशाची महाडिकांना मस्ती; सतेज पाटलांचा हल्लाबोल
- संचारबंदीमध्ये ऑनलाईन फसवणुकीत वाढ; मॅसेज, कॉल, लिंकला नागरिक पडता येत बळी
- महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, मॉर्गनला दंड बसल्यानं पीटरसन खूश, म्हणाला…
- ‘आ.गिरीश महाजन दाखवा, दहा लाख मिळवा’, राष्ट्रवादीचे आवाहन
- करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन आर्थिक संकटात; ‘तख्त’च्या निर्मितीवर परिणाम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

