औरंंगाबाद : शहरातील गारखेडा परिसरात राहणा-या २७ वर्षीय उच्चशिक्षीत तरूणीसोबत विवाह करून तिची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह १३ जणांविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील विशालनगरात राहणाNया २७ वर्षीय तरूणीचा विवाह २ ऑगस्ट २०२० रोजी सचिन विठ्ठलराव ठोंबरे (वय ३२, रा.शिवाजीनगर, पाथरी, जि.परभणी) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सचिन ठोंबरे याच्या पहिल्या कथीत प्रेयसीने तक्रारदार तरूणीच्या मोबाईलवर व्हॉटसअप आणि फेसबूक अकाऊंटवर सचिन ठोंबरे याच्यासोबत काढलेले फोटो, व्हीडीओ तसेच ऑडीओ क्लिप पाठवून सचिन ठोंबरे याच्यासोबत २०१३ सालापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तसेच तुझ्यासोबत त्याने लग्न फक्त कॉम्प्रमाईज म्हणून केले असल्याचे सांगितले.तक्रारदार तरूणीने याबाबत पती सचिन ठोंबरे याच्यासह सासू-सास-यांना विचारले असता, त्यांनी तक्रारदार तरूणीस तुझी आणि तुझ्या कुटुंबियाची समाजात बदनामी होईल असे सांगून याची वाच्यता करू नको असे सांगितले.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदार तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून तीचा पती सचिन विठ्ठलराव ठोंबरे, सासरा विठ्ठल रामभाऊ ठोंबरे, सासू शोभाबाई विठ्ठलराव ठोंबरे, दिर नितीन विठ्ठलराव ठोंबरे, बळीराम वानखेडे, हरिबाई बळीराम वानखेडे, प्रा.तुळीदास काळे, शेषराव पोटफाडे, प्रमोद पोटफाडे, लता शेषराव पोटफाडे, सुशीला सटवा वाघमारे, ज्ञानेश्वर काळे यांच्यासह सचिन ठोंबरे याची कथीत प्रेयसी हेमलता उर्फ हेमा बबनराव पिंपळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

