औरंगाबाद : घरा समोरील मोकळ्या जागेत हॅन्डल लॉक करुन उभी केलेली दुचाकी चोरणार्या चौघांना दौलताबाद पोलिसांनी मंगळवारी दि.१८ रात्री अटक केली. आरोपींना गुरुवारपर्यंत दि.२० पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी बुधवारी दि.१९ दिले.
अक्षय पुरुषोत्तम खंदारे (२५, रा. पंढरपुर, काचीपुरा झोपडपट्टी) , पांडुरंग लक्ष्मण अहिरे (३३, रा. दुधड, करमाड), बाबाजी महादेव शेजुळ (४४, रा. कान्होळ, गोलटगाव) आणि बाबासाहेब सांडू त्रिभूवन (३०, रा. वेरुळ, ता. खुलताबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
माळीवाड्यात राहणारे दादासाहेब जगन्नाथ हेकडे (३६) यांनी त्यांची दुचाकी (क्रं. एमएच-२०-सीएफ-६७९८) १४ डिसेंबर २०१८ रोजी घरासमोरील मोकळ्या जागेत उभी केली असता चोरट्यांनी ती लंपास केली. प्रकरणात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आज चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी आरोपींनी चोरी केलेली दुचाकी कोणाला विक्री केली किंवा कोठे ठेवली याचा तपास करणे आहे. आरोपींचे आणखी साथीदार आहेत का तसेच आरोपींनी दौलताबाद परिसरात अशा प्रकारचा गुन्हा केला आहे का याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या


