Share

संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला करणारे चार आरोपी अटकेत, इतर समाजकंटक फरार

Published On: 

अहमदनगर : संगमनेर शहरातील तीन बत्ती परिसरात काही उपद्रवी नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या हल्ल्यातील सुमारे २२ पेक्षा अधिक आरोपींची ओळख पटवण्यात यश आले आहे. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना काही मोकाट नागरिकांनी विनाकारण पोलिसांवर हल्ला केला. या घटनेचा राज्यभरातून निषेध होतोय. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना मारणाऱ्या समाजकंटकावर तीव्र कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरतेय. या प्रकरणी सत्ताधारी राजकीय नेत्यांनी डोळेझाक केले असले तरी नागरिकांच्या दबावामुळे पोलिसांनी आरोपींवर कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी सकाळपासून आरोपींच्या परिसरात छापासत्र सुरू केले होते. या प्रकरणातील मुसेब अलाउद्दीन शेख (वय 31, रा. अपनानगर), आसिफ मेहबूब पठाण (वय 31, रा. मोगलपुरा), युनूस मन्सूर सय्यद (वय 24, रा. गवंडीपुरा) व मोसीन इमाम शेख (वय 35, रा. जम्मनपुरा) या चौघांना अटक करण्यात आली. हल्ला करण्यात पुढे असणारे काही समाजकंटक मात्र अटकेच्या भीतीने पसार झालेत. या चौघांच्या चौकशीतून पोलिसांना अन्य संशयितांच्या माहितीसह इतरही गोष्टींची उकल करता येणार आहे.

मोगलपुरा भागात गुरुवारी कोरोनाचे नियम डावलून गर्दी झाली होती. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. मात्र, त्या जमावानेच पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत एका खासगी वाहनाची काच फुटली, तसेच अन्य वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांना केलेल्या धक्काबुक्कीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात जनक्षोभ निर्माण झाला. घरदार सोडून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोका पत्करून काम करणाऱ्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा विविध क्षेत्रांतून निषेध करण्यात येतोय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!