Share

मोठी बातमी : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि अहमदनगरचे माजी खासदार भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. आज (१७ मार्च) पहाटे दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी चाचणी केली असता त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर ते उपचारासाठी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात भरती झाले होते.

दिलीप गांधी यांनी ३ वेळा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये भाजपने या मतदार संघातून सुजय विखे यांना तिकीट दिल्याने दिलीप गांधी पक्षावर नाराज होते. भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा दिलीप गांधी यांचा प्रवास कौतुकास्पद होता. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. तर २९ जानेवारी २००३ ला त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपत घेतली होती.

त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये सलग दिलीप गांधी नगरचे खासदार म्हणून निवडून आले होते. नुकतेच नगर अर्बन को-ऑप बॅंकेची २२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. ६) बॅंकेच्या एका तत्कालीन संचालकासह दोन आरोपींना अटक केली आहे. पिंपरीतील मोरवाडी न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. ९) पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणात बॅंकेचे तत्कालीन संचालक असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांचीही चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!