नवी दिल्ली : रोहित शर्माला (Rohit Sharma) भारतीय एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय शहाणपणाचा असल्याचे सांगून माजी निवडकर्ता सबा करीम (Saba Karim) म्हणाले की, विराट कोहली (विराट कोहली) आणि रोहित शर्मा या दोघांमध्ये चागली मैत्री असून ते भारतीय क्रिकेटला पुढे नेऊ शकतात.
रोहित शर्माला या महिन्याच्या सुरुवातीला एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते तर कोहली कसोटी संघाचे नेतृत्व करत राहील असे सांगण्यात आले होते. रोहित शर्मा जर वेळेवर फिट होऊन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर परतला तर तो प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माला डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
सबा करीम पुढे म्हणाले, ‘माझा विश्वास आहे की रोहित आणि विराटमध्ये बंधुभाव आणि आदर आहे. आणि दोघेही राहुल द्रविडकडे मदतीसाठी जाऊ शकतात. भारतीय संघासाठी ते खूप चांगले काम करतील. असे देखील त्यांनी म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांच्या ‘अतरंगी’ फोटोनंतर नितेश राणेंनी शेअर केला ‘हा’ फोटो; म्हणाले,‘ओळखा पाहू कोण?’
- ‘रात्रीस खेळ चाले’चा हा प्रयोग प्रभावी ठरणारा असला तरी…- संजय राऊत
- नियमांचे पालन सगळ्यात आधी पंतप्रधानांनी करायला हवे – संजय राऊत
- चिंताजनक! देशातील ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ४१५ वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- ‘हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान,समृद्धी,उत्तम आरोग्य,प्रेम आणि अहिंसा घेऊन येवो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

