🕒 1 min read
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती सध्या ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आल्याने आणि प्रकृत्ती अस्वस्थ वाटत असल्याने डॉ. मनमोहन सिंह यांना दि. १३ ऑक्टोंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
Former PM Dr Manmohan Singh, who was admitted to AIIMS, Delhi earlier this month, has been discharged after treatment
(File photo) pic.twitter.com/9wM1wRSWf7
— ANI (@ANI) October 31, 2021
२००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोनाची लागण झाली आहे. ते १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी ४ मार्च आणि २ एप्रिल रोजी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
मनमोहन सिंग हे ८८ वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. त्यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया १९९० मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर २००९ मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भावना गवळींना ईडीची नोटीस मिळताच चिकनगुनिया झाला, इतका हा गंभीर रोग’, भातखळकरांची खोचक टीका
- उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती
- ‘…त्यांनी ठाकरे सरकारचे बाप असलेल्या शरद पवारांना दाऊदसोबत कोण बसलं होतं?’, हे विचारावं
- देशभरात काँग्रेस पक्षाला सोडून कोणतीही आघाडी होऊ शकत नाही; संजय राऊत यांचे मत
- ‘दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार’, किरीट सोमय्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

