Share

रावळपिंडी पिच वादात माजी पाकिस्तानी खेळाडूची उडी, रमीझ राजावर साधला निशाणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया याने रावळपिंडी पिचच्या वादात उडी घेतली आहे. त्याने याबद्दल एक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी रावळपिंडी पिचचा बचाव केला आहे. त्यामुळे मी खुश नाही.

कनेरिया पुढे म्हणाला की, “रमीझ राजा यांनी जे काही बोलले आहे. ते यातून पळवाट काढत आहेत असे स्पष्ट होतेय. त्यांनी खोटे बोलून चाहत्यांना धोका दिला आहे. हा हे बरोबर आहे की ते आपल्या मुलाच्या लग्नात व्यस्त आहेत. यामध्ये या पिचवरून खूप प्रश्न उपस्थित होत आहेत. ऑस्ट्रेलिया इतक्या वर्षांनी पाकिस्तानमध्ये आला आहे. आणि ह्यांनी असे पिच दिले.”

या अगोदर रमीझ राजा यांनी पिचबद्दल बोलताना म्हणले होते की, “आमची गोलंदाजी थोडी कमजोर होती. त्यामुळे आम्ही जलदगती गोलंदाजांसाठी पिच नव्हते बनवले. हसन अली दुखापती मुळे बाहेर आहे. त्यातच फलंदाजीमधेही सलामी फलंदाज आमचे नवीन होते. त्यामुळे आम्ही पिचबद्दल कोणती रिस्क घेतली नाही.”

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ४ बाद ४७६ धावांवर घोषित केला होता. तर ऑस्ट्रेलियाने पहिला डावात सर्वबाद ४५९ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानने दुसऱ्या डावात बिनबाद २५२ धावा केल्या. सामन्याचे ५ दिवस संपल्यामुळे सामना अनिर्णीत राहिला.

महत्वाच्या बातम्या :  

  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!