Share

UP Results 2022 : उत्तर प्रदेशात पहिल्या कलांमध्ये भाजपची ‘सेंच्युरी’ पार

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या कलाचे निकाल समोर आले असून भाजपने सेंच्युरी पार केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता असणाऱ्या भाजपने सुरुवातीच्या कलांमध्ये जबरदस्त आघाडी घेतली असून भाजपा १०० हून अधिक जागांवर पुढे असून सपादेखील ७० च्या पुढे आहे. त्यामुळे भाजप आणि सपा मध्ये चांगलीच काटेकी टक्कर बघायला मिळत आहे.

दरम्यान, १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत देशामध्ये पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण ४०३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!