🕒 1 min read
नवी दिल्ली: गोव्यात ( Goa elections) सुरुवातीच्या आकडेवारीनूसार काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ४० पैकी २० जागांवर काँग्रेस पुढे आहे, तर भाजपाने १६ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान गोव्यातील आघाडीचे उमेदवार असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar leads) आघाडीवर आहेत.
दरम्यान पणजी मधून उत्पल पर्रिकर आघाडीवर असून सुरुवातीच्या कलांप्रमाणे त्यांनी आघाडी घेतली आहे. तर उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपा १०० पार पोहचली आहे. दरम्यान ताज्या माहितीनुसार पंजाबमध्ये आप पक्ष तर उत्तराखंडमध्ये भाजपला आघाडी मिळताना दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपने २९ जागणी आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेस २८ वर आहे.
तर पंजाबमध्ये आप पक्ष ३५ जागांनी आघाडीवर आहे. त्याखालोखाल काँग्रेस २० जागांवर आहे. तर युपीमध्ये भाजप सर्वाधिक १०२ जागांवर आघाडीवर आहे. तर सपा ६७ जागांवर आहे. उत्तराखंडमध्ये भाजप २२ जागांनी आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“खेळ करण्यापेक्षा या महाकत्तलखान्याचे रचयिता कोण…”, आशिष शेलारांचा घणाघात
-
UP Results 2022 : ‘सपा’चे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ मागणी
-
Election Result 2022 : यूपीमध्ये काँग्रेस-बसपाला धक्का, पंजाबमध्ये आप तर उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर
-
UP Results 2022 : उत्तर प्रदेशात पहिल्या कलांमध्ये भाजपची ‘सेंच्युरी’ पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
