मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आता चांगलेच अडचणीत आले आहेत. न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तीन जणांना फरारी गुन्हेगार घोषित केले आहे. त्यांच्याकडे आता हजर होण्यास 30 दिवसांचा कालावधी असून, त्यानंतर मुंबई पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये दिसतील.
खंडणी प्रकरणी दाखल गुन्ह्यात परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग आणि रियाज भाटी यांना आज न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले. गोरेगाव पोलिसांकडे हा गुन्हा दाखल आहे. हे आरोपी फरार असून, ते सापडत नसल्याने त्यांना फरारी गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. यानुसार न्यायालयाने परमबीरसिंह यांच्यासह तिघांना दणका दिला आहे.
आता मुंबई पोलीस परमबीरसिंह यांच्या निवासस्थानावर ते फरार गुन्हेगार असल्याची नोटीस लावू शकतात. त्यांना हजर होण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी असेल. ते 30 दिवसांत हजर न झाल्यास त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास मुंबई पोलीस सुरवात करतील. यात परमबीरसिंह यांच्या मालमत्ताही जप्त केल्या जाऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
- विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या; शरद पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’
- मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत- नवाब मलिक
- राज्याने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा; नाना पटोलेंचा सल्ला
- सरकार कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा, सेवा समाप्तीच्या धमक्या देतंय- गोपीचंद पडळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

