मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला करण्यात आला होता. याच प्रकरणात महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ह्या दाम्पत्याला भेटण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस स्टेशनला गेले होते. याच दरम्यान किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाली. या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यानंतर खार पोलिसांनी या तपासाला वेग आणला होता. यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार महाडेश्वर यांच्या कडून करण्यात आली होती.
यावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “यावर कोणती कलमे लावली आहेत. हे महत्वाचं आहे. महाडेश्वर यांच्यावर अजामीनपात्र कलमे लावून, यामागचा खरा मास्टरमाइंड कोण आहे याचा तपास झाला पाहिजे. तरच ह्या गुन्ह्याची गंभीरता स्पष्ट होईल.” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
यावर शिवसेना मनीषा कायंदे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. “किरीट सोमय्या यांच्या गाडीतील इतरांना कसलीही इजा झाली नाही. आज ते दिल्लीला गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर साधी चिकटपट्टी नव्हती. जीवे मारायचा प्रयत्न या तर खूप मोठ्या गोष्टी झाल्या. आता भाजपच्या सुज्ञ नेत्यांनाही किरीट सोमय्यांची बाजू घ्यावी लागते, हेच दुर्दैव आहे,’ असा टोला मनीषा कायंदे यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

