Share

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याहस्ते सरदार पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण

Published On: 

औरंगाबाद : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण, शाहगंज येथील चमन येथे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाले. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याव अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु, सध्याचा काळ पाहता त्यांनी हा कार्यक्रम माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्याच्या सुचांना केल्या, मुख्यमंत्री आले कि गर्दीहि होणार, सध्या शहरात कोरोना चांगला आटोक्यात आहे. परंतु, डेल्टा प्लसमुळे कोरोना डोके वर काढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले, निधी हा मिळतो तो सुविधांसाठी परंतु, भारताला अखंड काम करणारे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासाठी माजी खासदार खैरेंनी तेंव्हा यासाठी ४० लाख रुपये निधी दिला. त्यामुळे आज या पुतळ्याचे अनावरण होत आहे. पटेल यांची भावना अखंड भारत एक करण्याचे कार्य केले. त्यांनी पोलीस ऍक्शन घेतली, कठोर पणे ही कारवाई केली, अखंड ते वरचा डाग पुसला गेला. १९४८ हे मराठवाड्याचे स्वातंत्र्याचे वर्ष, २०२३ ला ७५ वर्ष मराठवाड्याला होत आहे. पुणे, नागपूरच्या धर्तीवर सुपर संभाजीनगर होणार, तीन शहराच्या मालिकेत संभाजीनगर चा उल्लेख असेल, त्यावेळी दैदिप्यमान सोहळा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पाणी योजनेला ३ वर्ष लागणार असून त्यासाठी पाण्याचे ५२ मनोरे उभारणार आहे. ती योजना आल्यावर सर्वांना समान पाणी मिळेल, आठवड्यातून एकदा पाणी येत आहे, अशा अनेक तक्रारी आल्या. पाणी देण्यासाठी काय वाटेल ते करा वेळा पत्रकात सुधारणा करा, योजना येल तेंव्हा येईल, तीन वर्षे थांबायला लागेल पण वेळा पत्रक सुधारवा लागेल. त्यामुळे सुपर संभाजी नगर हे स्वप्न स्वप्न राहणार नाही, गुंठे वारी मध्ये कमीत कमी बोजा मिळेल, सिडको फ्री होल्ड लीज होल्ड साठी बारकाईने लक्ष घातल्याने, तपशील झाला की ते ही होईल असे सुभाष देसाई म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!