Share

नांदेड जिल्हा बँकेवर माजी आमदार नागेश आष्टीकर बिनविरोध

Published On: 

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या निवडणुकीनेकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. नांदेड जिल्ह्यातील निवडणुकीत २३ रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये चर्चा होवून सेवा सहकारी संस्था हदगाव मतदारसंघात माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले.

माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडील ४० ते ४२ मतदारांचे संख्याबळ असल्याची बातमी दोन दिवसापूर्वीच दैनिक पुण्यनगरीने प्रकाशित केली होती. तसेच हदगावची निवडणूक हे एकतर्फीच होणार असे भाकित केले होते. त्यावरून राजकीय गोटात खळबळ उडाली. परंतु सत्य बातमी देऊन संपूर्ण परिस्थिती लोकांच्या आणि नेत्यांच्या नजरेत आणून दिली होती.

त्याप्रमाणेच मंगळवारी महाविकास आघाडीत चर्चा होऊन जास्त संख्याबळ असलेल्या उमेदवारांनाच बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला. या निर्णयामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीमध्ये सरशी घेण्यात यश आले. यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा या प्रकारे निवडणूक लढवावी अशी अपेक्षा कार्यकर्ता करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!