Share

आरपीआयच्या माध्यमातून आता मी देशासाठी काम करेन : पायल घोष

Published On: 

मुंबई : अभिनेता –दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गंभीर आरोप करत चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष यांनी नुकताच रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईत रिपाईत प्रवेश केला.अनुराग कश्यपवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आपण पायल घोषला पूर्ण पाठींबा देतो आहोत असंही आठवले म्हणाले.

पायल सोबतच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास पाच ते सात कार्यकर्त्यांनी देखील रिपाईत प्रवेश केला यामुळे निश्चितच पक्षाचे बळ वाढले आहे.पायलच्या पक्षप्रवेशावेळी रिपाई कार्यकर्त्यांनी ‘ महिलाओ के सन्मान मै आरपीआय मैदान मै , अशा जोरदार घोषणा दिल्या.

‘आठवले सरांनी मला नेहमीच मदत केली आहे आणि माझ्या दुःखाच्या काळात तर ते माझ्या सोबत एखाद्या देवासारखे उभे राहिले म्हणून मी सरांच्या पक्षात प्रवेश करते आहे, असं पायल आपल्या मनोगतात म्हणाली.या पत्रकार परिषदेत पायलने देखील आपले मनोगत मांडले आहे.

‘रामदास आठवलेंनी नेहमीच माझी बाजू घेतली. त्यासाठी मी सरांची आभारी आहे. त्यांनी मला नेहमीच मदत केली. त्यांनी महिलांना नेहमी पाठिंबा दिला आहे, म्हणूनच मी आरपीआय पक्षात सहभागी होण्याचे ठरवले आहे. जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी पक्षाच्या माध्यमातून देशासाठी काम करणार आहे. आपण आपल्या देशासाठी काही करू शकलो तर त्यात मला आनंद आहे’, असे पायल घोष यावेळी म्हणाली.

दरम्यान, नुकताच रिपब्लिकन पक्षात हरयाणात ब्राह्मण समाजाचे नेते मुरारीलाल चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर रिपाईचे बळ हरयाणात देखील वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!