🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल २०११ रोजी सर्व भारतीयांची २८ वर्षाची प्रतिक्षा संपली होती. भारताने विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत संपुर्ण देशाला जल्लोषाची संधी दिली होती. त्यावेळी भारतीय संघाने सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेउन मैदानची चक्कर मारली होती. मात्र त्याचवेळी सचिनसोबत भारतीय संघाचे त्यावेळचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनाही खांद्यावर उचलुन घेतले होते.
यानंतर काही वेळाने गॅरी कर्स्टन यांचा प्रशिक्षक पदाचा कालावधी संपला. आणि त्यांनी भारतीय संघाचा निरोप घेतला. यानंतर गॅरी कर्स्टन यांच्याबद्दल नुकतीच एक माहिती समोर आली आहे. गॅरी कर्स्टन यांनी नेदरलँडच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा कारभार स्विकारला आहे. नेदरलँड्सचे मुख्य प्रशिक्षक रायन कॅम्पबेल हे आहेत, तर जेम्स हिल्डीच आणि गॅरी कर्स्टन हे सहायक प्रशिक्षक आहेत. आगामी काळात नेदरलँड्स तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा करणार आहे. आयर्लंडविरुद्धचे हे सामने आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेशी निगडीत आहे.
२००७ ते २०११पर्यंत गॅरी कर्स्टन हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. यानंतर जून २०११मध्ये त्यांची दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती, मात्र ऑगस्ट २०१३मध्ये गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा पदभार सोडला. मागील वर्षी हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान प्रिमीअर लीगमध्ये कराची किंग्जच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक पद त्यांनी स्विकारले होते. मात्र कालांतराने हे वृत्त खोटे असल्याची माहिती समोर आली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘संभाजीराजेंची अवहेलना भाजपच्या अंगाशी येणार’, शिवसेना खासदाराचा इशारा
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी

