Share

मोठी बातमी ! इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज जिम पार्क्स यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज जिम पार्क्स यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. पार्क्स हे ससेक्सकडून काऊंटी खेळणाऱ्या सर्वात जुन्या क्रिकेटपटूंपैकी एक होते. ससेक्स क्रिकेटच्या मते, गेल्या आठवड्यात आजारी पडल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. ससेक्स क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे: “वयाच्या ९० व्या वर्षी जिम पार्क्सच्या निधनामुळे ससेक्स क्रिकेटला खूप मोठे दु:ख पोहचले आहे. गेल्या आठवड्यात घरी चालताना अचानक कोसळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते इंग्लंडचे सर्वात जुना कसोटी खेळाडू होते.

जिम पार्क्सचा जन्म १९३० मध्ये हेवर्ड्स हीथमध्ये झाला. त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी १९४९ मध्ये ससेक्सविरुद्ध क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. त्यांचा देशांतर्गत सामन्यांचा अनुभव अफाट होता. त्याचबरोबर त्यांनी ७३९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने आणि १३२ लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत ३६,००० प्रथम श्रेणी धावा आहेत.

यष्टीरक्षक फलंदाज होण्याअगोदर ते लेगब्रेक गोलंदाजी करायचे. त्यांनी इंग्लंडकडून ४६ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले. त्याच्या फलंदाजीच्या शैलीबद्दल बोलायचे झाले तर त्याची आक्रमक फलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यांची खेळण्याची शैली एकदिवसीय क्रिकेटसाठी योग्य होती. स्लॅग-स्वीप खेळण्यात ते तरबेज होते.

१९७३ मध्ये ससेक्ससह २३ वर्षे पूर्ण केल्यानंतर, पार्क्स सॉमरसेट काउंटीमध्ये सामील झाले, जिथे ते त्याच्या ४७ व्या वाढदिवसापर्यंत खेळले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर जिम ससेक्समध्ये विपणन व्यवस्थापक म्हणून पुन्हा सामील झाले. त्यांनी काउंटी अध्यक्ष म्हणून काम केले. २०१४ मध्ये काउंटीच्या १७५ व्या वर्धापन दिनाच्या समारंभातही त्यांनी हजेरी लावली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!