Share

माजी क्रिकेटपटू ‘इरफान पठाण’ने मारला धोनीला टोमणा

Published On: 

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमला संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला होता. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग हे दोन दिग्गज खेळाडू नसल्यामुळे चेन्नईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

धोनीच्या खराब खेळावरून सोशल मीडियावर सध्या धोनी बराच ट्रोल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील मॅच मध्ये खूप थकलेला दिसत होता धोनीच्या खेळावरून तो थकला असल्याच्या चर्चा सुद्धा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.

अनेकांनी सोशल मिडीयावरून याबाबत धोनीवर टीकाही केलीये. तर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने सुद्धा ट्विट केलंय. पठाण म्हणतो, ‘फक्त दोन ओळींनी डोकं गरगरलं, संपूर्ण पुस्तक वाचलं तर चक्कर पण येईल.’ पठाणच्या या ट्विटचा अर्थ धोनीशी जोडण्यात येतोय. यापूर्वी देखील पठाणने ट्विट केलं होतं. त्यावेळी तो म्हणाला, ‘काही लोकांसाठी वय हे केवळ एक नंबर असतं. तर काहींसाठी संघातून हकालपट्टी करण्याचं एक कारण’. तेव्हादेखील त्याने धोनीवर अप्रत्यक्षपणे टीका केली असल्याचं बोललं जात होतं.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!