औरंगाबाद : मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या माजी सैनिकाला पिटाळून लावण्याच्या आरोपाखाली अटक असलेले, माजी नगरसेवक यांचे एक भावनिक आवाहन करणारे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात ते नागरिकांसाठी एक नाही तर शंभर गुन्हे अंगावर घेण्याचा भावनिक मजकूर त्यात दिसत आहे.
काल रस्त्याने जात असतांना काही मुलांना महानगरपालिकेचे कर्मचारी सक्ती करतांना आढळून आले तेथे थांबून चौकशी केल्यास असे समजले की काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुले होते त्यांनी मास्क घातलेला होता फक्त तो मास्क नाकाच्या थोडासा खाली होता त्याकरिता महानगरपालिकेचे कर्मचारी दंड वसुलीसाठी सक्ती करत होते. मास्कचा वापर न करणे हे चुकीचेच आहे परंतु मास्क हा होता.
त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती गरीब होती ते मला म्हणाले की भाऊ आम्ही २००० रुपये ऐवढा दंड आम्ही भरुच शकत नाही. काही तरी मार्ग निघावा म्हणून महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांशी बोललो असता अतिशय मुजोर आणि दादागिरीच्या भाषेमध्ये बोलत त्यांनी मला उत्तर दिले. ग्रामीण भागातून स्वप्न घेऊन आलेल्या ह्या गरीब मुलांनी २००० रुपये दंड कसा भरायचा ? दंड वसुली करायला तुम्हाला सामान्य आणि गरीबच सापडतात का ? दादागिरी आणि मुजोरी करून शिव्यागाळ करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी ? असा जाब मी त्यांना विचारला असता महापालिका प्रशासनाने माझ्यावरती गुन्हा दाखल केला.
बऱ्याच दिवसांपासून अनेक असे प्रसंग घडता आहेत की फळवाले , हातगाडीवाले , छोटे व्यवसाय असलेले व्यावसायिक ह्यांच्याकडून सक्तीने दंड वसुली करण्याचे काम महानगरपालिका प्रशासन करत आहे.महानगरपालिकेचे प्रशासन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मिळून जी काही हिटलरशाही आणि दडपशाही शहरामध्ये चालवलेली आहे त्याच्या विरोधात मी नेहमीच सामान्य जनतेकडून उभा असेल आणि असे एक काय अजून शंभर गुन्हे घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे !!
असे सुरेंद्र कुलकर्णी यांच्या पत्रात लिहिले आहे. त्याला सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी त्यांची पोलीस कोठडी संपत आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर पुढील कारवाई होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही’ तर ‘एकटे देवेंद्र फडणवीस काय करणार?’ असं म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे : मोहोळ
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- आ.पवारांचे उपोषण मागे, महसूलमंत्री विधानभवनातच घेणार बैठक
- ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
